Ganesh Pran Pratishthapana Puja - श्री गणेश प्राण प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजाविधी

Shree Ganesh pran Pratishthapana Puja: गणेश चतुर्थी 2023 - श्री गणेश प्राण प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजाविधी



गणेश उत्सव हा सण भाद्रपद महिन्यात येतो गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो, यावर्षी गणपती भाद्रपद महीण्याच्या शुक्ल पक्षातील 19  सप्टेंबर 2023  रोजी येत आहेत, हिंदू पंचांगानुसार 18 सप्टेंबर पासून गणेश चतुर्थीला दुपारी 12: 39 मिनिटांनी सुरुवात होत आहे, परंतु 19 तारखेपासूनच गणेश चतुर्थीला सुरुवात होइल . यावर्षीचा प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त सकाळी

11 :7 मिनिटे ते दुपारी 1: 43  मिनिटांपर्यत आहे,  यावेळेत गणेश प्राण प्रतिष्ठापना करावी.


गणेश पूजा करण्याकरिता भटजीच पाहिजे अशी आवश्यकता नाही, भटजी उपलब्ध नसल्यास आपण स्वतः देखील पूजा विधी करू शकता, पुजा करण्यापुर्वी हा लेख संपूर्ण वाचावा


गणपती पूजा विधि व साहित्य :


सर्वप्रथम मखरामध्ये  गणपतीची पाटावर स्थापना करावी. पाण्याने भरलेला तांब्या, पंचपात्र, पळी, ताम्हण, कापुस, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, पंचामृत, चंदन अथवा अष्टगंध ,हार फुले ,कापूर् ,अगरबत्ती,धुप ,तुप , दुर्वा , शमी,अक्षता,प्रसादाकरिता पेढे, मिठाई, मोदक अथवा गोडधोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.व पूजेला सुरुवात करावी


गणपतीच्या नेत्रांना दुर्वाने तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला उजवा अंगठा लावून पुढील मंत्र म्हणावा.


प्राणप्रतिष्ठापना मंत्र :


अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।

अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।

रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।

पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।

बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।

देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।

असा मंत्र म्हणून गणेशाला नमस्कार करावा

गणेशाच्या मूर्तीचे ध्यान करत पुढील मंत्र म्हणावा

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।

पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।।

ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।

चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।।

दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।

मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।।


वरील मंत्र म्हणून गणेशाचे ध्यान करावे .ध्यान झाल्यावरती आवाहन मंत्र म्हणावा


आवाहन मंत्र :


आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।

अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।


असा मंत्र म्हणून मूर्तीवर अक्षता अर्पण कराव्यात


विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।

स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।


असा मंत्र म्हणून मूर्तीला आसनस्थ होण्यासाठी अक्षता वहाव्यात


सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।

विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।।


 वरील मंत्र म्हणून मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे


त्यानंतर गणेश अर्ध्य मंत्र म्हणावा :


अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।

गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून पळीभर पाण्यात सुपारी ठेवून सुपारीला गंध, अक्षता, पुष्प वहावे व पळीतले पाणी फुलाने, अर्ध्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.


आचमन मंत्र :


विनायकम् नमस्तुभ्यम् त्रिदशैरभि वंदित।

गंगाहृतेन तोयेन शीघ्रम आचमनम् कुरु।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनियम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून श्री गणेशाच्या हातावर फुलाने पाण्याचा (आचमन) स्पर्श करावा 


गंगादि सर्वतीथेर्भ्य आनीतम् तोयमुत्तम्।

भक्त्या समपिर्तम् तुभ्यम् स्नानाय आभिष्टदायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून श्री गणेशावर फुलाने पाणी शिंपडावे


पंचामृत स्नान मंत्र :


पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।

पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून श्रीगणेशांना फुलाने पंचामृत पळीने ( दूध, दही, तुप, साखर आणि मध) अर्पण करावे. नंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. या वेळी सुगंधी अत्तर, पळीत पाणी घेऊन दिव्यावर गरम पाणी करून फुलाने अर्पण करावे.


यानंतर अथर्वशीर्ष म्हणावे अथर्वशीर्ष तुम्हाला आरतीच्या पुस्तकात किवा गूगल वर मिळेल


वस्त्र मंत्र :


रक्तवस्त्रयुगम् देव दिव्यम् कांचनसंभवम्।

सर्वप्रदम् गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून गणेशाला कापूस अथवा वस्त्र अर्पण करावे


यज्ञोपवीत मंत्र :


राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।

गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून जानवे श्री गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उजव्या हाताच्या बाजूने अर्पण करावे


चंदन मंत्र :


रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन।

ललाटपटले चंदस्तस्योपरि विधार्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षताम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून श्री गणेशाला चंदन अथवा अष्टगंध लावावे


पुष्प मंत्र :


माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।

मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून श्री गणेशाला फुले दूर्वा शमी आदी अर्पण करावे


धूप मंत्र :


दशांगम् गुग्गुलम् धूपम् सुगंधम् च मनोहरम्।

गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम् नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून उजव्या हाताने गणपतीला धुप ,अगरबत्ती  दाखवावी व डाव्या हाताने घंटी वाजवावी


दीप मंत्र :


सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह।

गृहाण मंगलम् दीपम् रुद्रप्रिय नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून श्री गणेशाला दीप दाखवून ओवाळावे


नैवेद्य मंत्र :


नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।

ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून गणेशाला नैवेद्य,मोदक ,पेढे अर्पण करा


विडा मंत्र :


पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ ।

कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्‌ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल तांबुलम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांना पानाचा विडा अर्पण करावा.


दुर्वा मंत्र :


गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।

एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।।

विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।

कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।।


वरील मंत्र म्हणून 21 दुर्वांची जुडी वहावी


यानंतर श्री गणेशाची आरती करावी


नमस्कार मंत्र :


नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।

साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।।


वरील मंत्र म्हणून श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करावा


प्रदक्षिणा मंत्र :


यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।

तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे।।


वरील मंत्र म्हणून स्वतःभोवती पाच प्रदक्षिणा घालावेत


मंत्रपुष्प :


विनायकेशपुत्र त्वम् गणराज सुरोत्तम।

देहि मे सकलान् कामान् वंदे सिद्धिविनायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। मंत्रपुष्पम् समर्पयामि।।


वरील मंत्र म्हणून देवाला फुले अर्पण करून हात जोडावे व पुढील प्रार्थना करावी


प्रार्थना मंत्र :


यन्मया चरितम् देव व्रतमेतत् सुदुर्लभम्।

गणेश त्वम् प्रसन्न: सन् सफलम् कुरु सर्वदा।।

विनायक गणेशान् सर्वदेव नमस्कृत।

पार्वतीप्रि य विघ्नेश मम विघ्नान् निवारय।।

आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।

पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।

मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तितहीनम् सुरेश्वर।

यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।

अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।

तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।। 


।। इति श्री ।।


वरील मंत्र म्हणून श्री गणेशाची मनोभावे पूजा करावी व अशा प्रकारे पूजा विधी संपन्न करावी.


पूजा साहित्याची आवश्यकता असल्यास खालील लिंकवरून मागवावे.


Post a Comment

Previous Next

نموذج الاتصال